
शिरूरच्या टाकळी हाजी बेट परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून बुधवारी रात्री टाकळी हाजी गावात सहा दुकाने अज्ञात चोरटयांनी फोडली. मलठण येथे एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न होता. मात्र, पोलीस व ग्रामसुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा प्रयत्न फसला. बुधवारी रात्री टाकळी हाजी गावामधे हॉटेल, मेडीकल, व इतर दुकानाची शटर तोडून रोख रक्कम चोरण्यात आली. सीसीव्ही फूटेजमधे चार तरुण तोंड बांधून दरवाजे तोडताना दिसत आहेत. त्यानंतर मलठण येथे एका बँकेचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाला. मात्र, तेथे पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे व पोलिस कॉन्टेबल उमेश जायपत्रे ग्राममुरक्षा दलाच्या तरूणांसह पोहचल्यांने चोरांनी उसाच्या शेतात पळ काढला. या आठवडयात जांबूत, पिंपरखेड येथेही दुकाने फोडून चोरीच्या घटना घडल्या आहेत. तसेच आमदाबाद येथून माऊली नरवडे यांची घरासमोरून हिरोहोन्डा गाडी चोरण्यात आली. चोरांचा शोध सुरू आहे. शिरूरच्या पश्चिम भागात चोरीच्या घटना वाढल्या असून जनतेत भीतीचे वातावरण आहे.



























































