
पाकिस्तानचे नामवंत लेगस्पीनर अब्दुल कादीर यांचे लाहोर येथील रुग्णालयात शुक्रवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. निधनसमयी कादीर 63 वर्षांचे होते. लष्करी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, 4 मुलगे आणि 1 कन्या असा परिवार आहे.
पाकिस्तानकडून 67 कसोटी खेळणारे कादीर यांनी 236 विकेटस् मिळवल्या तर 104 वन डे लढतींत त्यांनी 132 विकेटस् मिळवल्या. आपल्या विचित्र आणि आगळ्यावेगळ्या बॉलिंग ऍक्शनमुळे ते क्रिकेट जगतात प्रसिद्ध होते. 1977 ते 1993 या कालखंडात कादीर यांनी आपल्या फिरकी माऱयाने जगातल्या भल्या भल्या फलंदाजांच्या विकेट मिळवल्या.
























































