
>> भालचंद्र मगदूम
तब्बल 75 ते 77 वर्षे जपलं गेलेलं तावडे हॉटेल आणि कोल्हापूरचं नातं. केवळ आपल्या नावावर ओळख टिकवून ठेवणाऱ्या या हॉटेलच्या आठवणी महापुराच्या निमित्ताने पुन्हा जाग्या झाल्या.
परवाच्या पावसानं, महापुरानं कोल्हापूरकरांना चांगलाच इंगा दाखविला. पंचगंगेची ‘मच्छिंद्री’ होऊन पाणी सैरभर झालं अन् हजारो जणांच्या तोंडचं पाणीच पळालं. मात्र, एक नाव, ठिकाण अबाधित राहिलं अन् राहणार. भले ती खूण वीस वर्षांपूर्वी मिटली असली तरीही. या महापुराच्या निमित्तानं या ठिकाणाची, नावाची अन् खुणेची आठवण पुन्हा एकदा आली आणि येतच राहणार. ते म्हणजे ‘तावडे हॉटेल’.
कोल्हापुरात येण्यासाठी मुंबईपासून कन्याकुमारीपर्यंतच्या महामार्गाकर कोणत्याही ट्रकमध्ये बसायचं. ट्रक ड्रायव्हर कन्नड, तामीळ, मल्याळी, केरळी बोलणारा असू दे, त्याचा एक शब्दही तुम्हाला नाही कळू दे, कोल्हापुरात उतरायचं असेल तर कोल्हापूर नक्हे, फक्त ‘तावडे हॉटेल’ असं म्हणायचं. तो ट्रक बरोबर कोल्हापूरच्या फाटय़ावर येऊन थांबणार. म्हणजेच आपण ‘तावडे हॉटेल’ केवळ या एका शब्दाच्या पत्त्यावर कोल्हापुरात येऊन पोचणार.
तावडे हॉटेल आणि कोल्हापूरचं नातं असं एक नव्हं, दोन नव्हं, तर तब्बल 75 ते 77 वर्षे जपलं गेलं आहे. विशेष म्हणजे आज ‘तावडे हॉटेल’चं अस्तित्व संपून वीस वर्षे झाली आहेत. ‘तावडे हॉटेल’च्या खुणा नव्या चौपदरी महामार्गाखाली पूर्ण गाडल्या गेल्या आहेत. तरीही ‘तावडे हॉटेल’ केवळ आपल्या नावावर ओळख टिककून आहे. नुकत्याच आलेल्या महापुरानं कसलाही संबंध नसलेल्या ‘तावडे हॉटेल’ची याद पुन्हा ताजी केली.
कोल्हापूर आणि गांधीनगर, वळिवडे, चिंचवाडकडे जाणारा रस्ता ज्या ठिकाणी येऊन मिळतो, तो फाटा म्हणजे ‘तावडे हॉटेल’ फाटा. आज या फाटय़ाला हॉटेलचे अस्तित्व सांगणारा एकही प्रत्यक्ष पुरावा नाही, पण ‘तावडे हॉटेल’ माहीत नाही असा एकही ट्रक, लक्झरी, एसटी ड्रायव्हर मुंबईपासून कन्याकुमारीपर्यंत मिळणार नाही. ज्यावेळी पुणे-बंगळुरू हायवे शिरोली, शिरोली नाका, रुईकर कॉलनी, काकळा नाका, रेल्वे फाटक असा होता, त्यावेळी गांधीनगरकडे जाणाऱया फाटय़ाला सन 1940 मध्ये शंकर कदम तथा तावडे यांनी एका खोपटात ‘हॉटेल’ सुरू केलं. हॉटेल साधं छपराचं, पांढऱया रंगाच्या भिंतींचं. दारात दोन लाकडाची बाकडी, रात्री एका बांबूला अडकवलेला मिणमिणता कंदील. त्या काळात ते हॉटेल म्हणजे जाणाऱया-येणाऱयांसाठीचा क्षणभराचा विसावाच होता. या हॉटेलात चहा, भजी आणि बिस्किटाचा पुडा मिळायचा. शंकर कदम आणि त्यांची बायको गिरिजाबाई हॉटेल चालकायचे व सहकुटुंब हॉटेलच्या मागेच एका छपरात राहायचे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोलंडचे निर्कासित कळिकडय़ाला निर्कासित छाकणीत राहायचे.
त्यांच्यासाठीच जे साहित्य येईल, ते या हॉटेलच्या दारातच उतरवले जायचं. तिथून टांग्यानं किंवा बैलगाडीनं छावणीत पोचवले जायचं. हे हॉटेल म्हणजे रात्री-अपरात्री येणाऱ्या-जाणाऱ्या वाटसरूंचा आधार होतं. हॉटेलच्या दारातील मिणमिणता कंदील हे एकटय़ा-दुकट्या वाटसरूला आधाराचं वाटायचा. या मार्गाकरून जाणाऱ्या प्रत्येक ट्रक ड्रायक्हरचं हक्कानं थांबण्याचं ठिकाण म्हणजे ‘तावडे हॉटेल’. ऍल्युमिनियमच्या पेल्यातलं पाणी आणि कपभर चहा घेतला की, ड्रायक्हर तरतरीत होऊन पुढे मार्गस्थ व्हायचा. त्यामुळे ‘तावडे हॉटेल’चं नाव दळणवळणाच्या क्षेत्रात एक संकेतस्थळ होऊन गेलं.
हॉटेल पुरात बुडालं!
हे हॉटेल शंकर कदम तथा तावडे यांच्यानंतर त्यांची मुले केरबा, पांडुरंग, बाबासाहेब, निवृत्ती आणि मुलगी हौसाबाई यांनी चालवलं. सन 1989 मध्ये पंचगंगेला महापूर आला अन् त्यात निम्मं हॉटेल बुडालं. त्यानंतर शिरोली नाका ते गांधीनगर फाटा रस्ता चौपदरी झाला. त्या रस्त्याखालीच ‘तावडे हॉटेल’च्या खोपटाचा शेवट झाला. वीस वर्षे झाली, ‘तावडे हॉटेल’चं इथं कसलंही अस्तित्व नाही, पण ‘तावडे हॉटेल’च्या आठकणी जाग्या आहेत. त्यामुळेच ‘तावडे हॉटेल’ नसले तरीही त्याची ओळख मात्र राहिली अन् राहणारच.
























































