
उत्तर प्रदेशच्या एसआरके महाविद्यालयात बुरख्यावर बंदी घाण्यात आली आहे. बुरखा काढल्यानंतरच महाविद्यालयात प्रवेश मिळेल अशी सूचना प्रशासनाने काढली आहे.
एसआरके महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या दोन गटात हाणामारी झाली होती. त्यानंतर कॉलेज प्रशासनाने कडक नियम लागू केले. त्यात बुरखा घातलेल्या विद्यार्थिनींना महाविद्याल्यात प्रवेश नाकारण्यात आला. बुरखा काढल्यानंतरच महाविद्यालयात प्रवेश मिळेल असे स्पष्ट आदेश प्रशासनाने दिले आहेत.
बुरखा हा ड्रेस कोडमध्ये मोडत नाही अशी प्रतिक्रिया महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी दिली. यापूर्वी आम्ही वर्गातही बुरखा घालून गेलो होतो असे काही विद्यार्थिनींनी सांगितले आता बुरखा घातल्यास प्रवेश देत नसल्याचेही त्यांनी सांगितले. ज्या तरुणी बुरखा घालून महाविद्यालयात येत आहेत यांना परत जाण्यास सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांच्या दोन गटांत हाणामारी झाली होती. त्यासाठी पोलिसांनाही पाचारण करण्यात आले ओते. त्यापूर्वी महाविद्यालयात कुठलाच ड्रेसकोड लागू कराण्यात आला नव्हता.

























































