
टेनिस जगतात मानाच्या मानल्या जाणाऱ्या अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला गटात चेक प्रजासत्ताकच्या बियांका आंद्रेस्क्यू हिने अजिंक्यपद मिळवलं आहे. 23 ग्रँडस्लॅम विजेती टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिचा पराभव करत तिने अजिंक्यपदाला गवसणी घातली. बियांकाने 6-3, 7-5 अशा सरळ सेटमध्ये सेरेनाचा पराभव केला. त्यामुळे 24व्या ग्रँडस्लॅमचे स्वप्न पाहणाऱ्या सेरेनाचा स्वप्नभंग झाला असून बियांकाच्या खात्यात पहिल्या ग्रँडस्लॅमची नोंद झाली आहे.
Teen queen #USOpen | #WomenWorthWatching pic.twitter.com/yKyucG6AtE
— US Open Tennis (@usopen) September 7, 2019
समोर सेरेनासारखी अत्यंत ताकदीची आणि अनुभवी खेळाडू असल्याने हा सामना कसा रंगणार आणि बियांका त्याला कशी सामोरी जाणार याबाबत उत्सुकता होती. पण सामना सुरू झाल्यापासून बियांकाने सेरेनाला निकराची झुंज दिली. तिचे प्रत्येक फटके तितक्याच दिमाखाने परतवून लावत बियांकाने सामन्यात आघाडी घेतली आणि बघता-बघता पहिला सेट जिंकला. पहिला सेट गमावल्यानंतर सेरेनाने दुसऱ्या सेटमध्ये आपला खेळ दाखवण्याचा प्रयत्न केला. तिने सुरुवातीचे गेम जिंकत सामन्यातील आव्हान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला, पण बियांकाने आपली लय कायम राखली आणि सरळ दुसरा सेट खिशात घालत विजेपदाला गवसणी घातली.



























































