मच्छिमारांना नुकसान भरपाई द्यावी यासाठी आज पासून अजित म्हात्रे यांचे बेमुदत उपोषण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवडी-न्हावा सागरी सेतू प्रकल्पात बाधित होणाऱ्या मच्छिमारांना नुकसान भरपाई मिळावी या साठी काँग्रेसप्रणित पनवेल तालुका पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अजित म्हात्रे हे सोमवार ता.09 पासून गव्हाण-कोपर येथे आमरण उपोषणाला बसणार आहेत. प्रत्येक मच्छिमाराला 9 लाख 90 हजार रूपये नुकसान भरपाई मिळाली या प्रमुख मागणीसाठी ते उपोषण करणार आहेत.

काही ठिकाणी मच्छिमार बांधवाना नुकसान भरपाई देण्यात आली मात्र काही मच्छिमारांना नुकसान भरपाई देण्यापासून जाणून बूजून उपेक्षित ठेवले आहे. सर्वाना सरसकट समान नुकसान भरपाई द्यावी, पुन्हा एकदा नव्याने सर्वे करून वंचित मच्छिमारांचे अर्ज दाखल करून घ्यावेत. प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या मच्छिमारांना व प्रकल्पग्रस्ताला कायम स्वरूपी नोकरी द्यावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत. सकाळी 10 वाजल्यापासून कोपर गावाजवळ माझगाव डॉक, सीप बिल्डर्स, टाटा गेट समोर हे उपोषण सुरू होणार आहे. या उपोषणाला उपस्थित राहून जास्तीत जास्त पाठिंबा द्यावा असे आवाहन अजित म्हात्रे यांनी केले आहे.