
जगभरात मंदीचा फेरा असला तरी बेस्टच्या एकाही कामगाराची नोकरी जाणार नाही. तुम्ही काळजी करू नका, तुमचे पगार वाढतील. जे कोणी नागोबा कामगारांमध्ये विष पसरवत असतील त्यांच्याकडे पुंगीशिवाय काही नाही. त्यांच्या नादाला लागून पदरात काहीच पडले नाही. त्यामुळे चला, युतीच्या भगव्या झेंड्याखाली एकत्र येऊन मुंबईला जगातील सर्वोत्तम शहर बनवूया, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.
He also launched “BEST Pravas”— A Mobile Application for passengers who use BEST to commute. It has features like Real-time ETA, citizens can explore various route information to plan their day. The app also features SOS in case of emergencies. pic.twitter.com/EaxRNuNAvI
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) September 9, 2019
बेस्टच्या बस ट्रकिंग मोबाईल ऍप आणि इलेक्ट्रिक बस सेवेचे लोकार्पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी कुलाबा आगारात झाले त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी महापौर पिं. विश्वनाथ महाडेश्वर, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत, उपमहापौर हेमांगी वरळीकर, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर, बेस्टचे अध्यक्ष अनिल पाटणकर, विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, आमदार सुनील शिंदे, राज पुरोहित, बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी बेस्टच्या ऍपला ‘बेस्ट प्रवास’ नाव सुचवणारे मनीष शिसोदिया यांचा सत्कार झाला.
ShivSena Party President Shri. Uddhavsaheb Thackeray inaugurated the first fleet of electric buses under BEST at the BEST Bhavan in Mumbai today. pic.twitter.com/VIMtUOw16y
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) September 9, 2019
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, ‘‘युतीची 25 वर्षे खडतर होती. एकत्र राहिलो. त्यामुळे हे भाग्याचे क्षण पाहायला मिळाले. परंतु जनतेची कामे केली नाहीत तर ते क्षणभंगूर ठरतील,’’ असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. मुंबईकरांना आता बेस्टमध्ये मोबाईलचा वापर करीत आपली बेस्टची नेमकी स्थिती कळणार आहे. तिला बस स्टॉपवर यायला किती वेळ लागणार आहे हेही समजणार असून ही बेस्टमधील एक प्रकारची क्रांतीच असल्याचे ते म्हणाले. आदित्य यांचे कौतुक एक वडील म्हणून नव्हे तर चांगला कल्पना सुचवणारे नेतृत्व म्हणून वाटत आहे. आधी पॉलिसीत बसत नाही म्हणून या बसेसना नकार देणार्या केंद्राने आदित्य यांचे ऐकून धोरण बदलले. आता पंतप्रधानांनी प्लॅस्टिकबंदीचा नारा देशभर नेण्याचे सूतोवाच केले याबद्दल आपण मोदींनाही धन्यवाद देत असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
एकूण 340 इलेक्ट्रिक बस धावणार
पहिल्या टप्प्यात या 40 इलेक्ट्रिक बस मंजूर झाल्या असून आता दहा बस आल्या असून नंतर 30 बस येणार आहेत. तर केंद्राच्या फेम-1 योजनेतून आणखी 300 इलेक्ट्रिक बस मुंबईत येणार असल्याचे बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी सांगितले.
या मार्गांवर इलेक्ट्रिक बस धावणार
बेस्टच्या ताफ्यात समाविष्ट होणार्या 10 इलेक्ट्रिक बसेसपैकी काही बसेस मार्ग क्र. 302 (प्रतीक्षानगर ते मुलुंड), सी-76 (शीव ते दहिसर), सी-42 (शीव ते ददलानी पार्क, ठाणे) मार्ग क्र. 352 (शीव ते ट्रॉम्बे), मार्ग क्र. 63 (चुनाभट्टी ते वसंतराव नाईक चौक) या मार्गांवर चालवण्यात येणार आहेत.
इलेक्ट्रिक बसचे चार्जंगही पर्यावरणस्नेही विजेने करा
बसच्या ताफ्यात आज प्रदूषणमुक्त दहा इलेक्ट्रिक बसचा समावेश झाला. या बसेसची बॅटरी तीन तास चार्ज करण्यासाठी धारावी येथे चार्जंग पॉइंट तयार करण्यात आला आहे. त्यामुळे चार्जंगसाठीदेखील कोळशापासून तयार झालेली वीज न वापरता सौरऊर्जेसारखी रिजनरेट वीजच वापरावी, असा सल्ला या वेळी उद्धव ठाकरे यांनी दिला.

























































