
बारामतीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम क्रिकेटप्रेमींच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या मैदानावर राज्यस्तरीय व रणजी सामने खेळविण्यासाठी अधिकृत मान्यता दिली आहे. विजय मर्चंट ट्रॉफीतील महाराष्ट्र व सौराष्ट्र यांच्यातील लढतीने 17 ऑक्टोबरला या स्टेडियमचा श्रीगणेशा होणार आहे. 12 ते 15 फेब्रुवारी 2020 दरम्यान महाराष्ट्र-उत्तराखंड संघांमध्ये या मैदानावर पहिला रणजी सामना रंगणार आहे.
























































