
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपप्रवेशाबाबत एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी त्यांच्या भाजपप्रवेशाबाबत माहिती दिली आहे.
आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली अपेक्षा आहे आपले हेच प्रेम व आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहील.@narendramodi @Dev_Fadnavis @nitin_gadkari @AmitShah pic.twitter.com/hNv7LYlRMU
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) September 13, 2019
या ट्विटमध्ये त्यांनी एक फोटो शेअर केला असून त्याद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अणित शहा यांच्या उपस्थितीत आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. उदयनराजे भोसले यांच्या प्रवेशाच्या वेळी केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी , राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे उपस्थित राहणार आहेत.




























































