
शिरोळ तालुक्यातील पावसाचे प्रमाण कमी झाले असून येथील कृष्णा, पंचगंगा नद्यांची पाणी पातळी कमी झाल्याने मंदिरातील पाणी कमी झाल्यामुळे श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिर 10 दिवसानंतर दर्शनासाठी खुले झाले आहे.आज पौर्णिमा असल्यानेन भाविकांची गर्दी मंदिरात दिसत होती.
शिरोळ तालुक्यात गेल्या चार 15 दिवसांपूर्वी झालेल्या दमदार पाऊसामुळे आणि कोयना राधानगरी धरण क्षेत्रात पडणाऱ्या धुवादार पावसाने तालुक्यातील कृष्णा पंचगंगा नदीच्या पाणीपात्रात वाढ होउन कृष्णा पंचगंगा या दोन्ही नद्या पात्राबाहेर पडून येथील श्री क्षेत्र नरसोबाचीवाडी येथे या मोसमातील तिसरा दक्षिणी द्वार सोहळा 15 दिवसांपूर्वी झाला होता. दरम्यान सतत पडणाऱ्या पाऊसामुळे नदीची पातळीत मोठी वाढ होऊन येथील श्री दत्त मंदिर पाण्याखाली गेले होते. मात्र गेल्या चार दिवसापासून पाऊस नसल्याने नदीची पाणी पातळी कमी होऊ लागल्याने आज येथील मंदिरातील पाणी कमी झाले आणि मंदिर दर्शनासाठी खुले झाले.
विशेष म्हणजे या वर्षातील तिसरा उतरता दक्षिणद्वार सोहळा व पौर्णिमा याचा हा योग भक्तांसाठी पर्वणीच म्हणावे लागेल या पर्वणीचा, मुले, पुरुष मोठ्या संख्येने स्नानाचा लाभ घेतला स्नानासाठी कोल्हापूर, मिरज, सांगलीसह कर्नाटक, कोकण या ठिकाणाहून भाविक आले होते.




























































