
गेवराई तालुक्यातील नागझरी येथे अज्ञातांनी केलेल्या चाकूहल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. संजय काकासाहेब चव्हाण असे त्याचे नाव आहे. शनिवारी दुपारी चार वाजता एका टोळक्याने संजयच्या छातीवर चाकूने वार केले होते. यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याला झाला उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
पूर्ववैमनस्यातून संजयची हत्या झाल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान या घटनेनंतर काहीकाळासाठी या परिसरात तणावाचे वातावरण होते.































































