82 माजी खासदारांची सरकारी बंगल्यात घुसखोरी, कारवाई होणार, वीज-पाणी तोडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लुटियन्स झोनमधील सरकारी बंगल्यांमध्ये 82 माजी खासदारांनी अद्याप घुसखोरी केलेली आहे. या माजी खासदारांवर सरकार आता कारवाई करणार आहे. तसेच या बंगल्यांची वीज-पाणीही तोडण्यात येणार आहे.

19 ऑगस्टला सी. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखालील लोकसभा हाऊसिंग कमिटीने 200 माजी खासदारांना बंगले रिकामे करण्यासाठी निर्वाणीची नोटीस दिल्यानंतरही 82 खासदारांनी अजून बंगले सोडलेले नाहीत. त्यांच्यावर ‘लोक आवास’ नियमांतर्गत कारवाई केली जाणार आहे.

आता पुन्हा माजी खासदारांना बंगले रिकामे करण्याचा आदेश देण्यात येणार आहे. हा आदेश पारित झाल्यानंतर लगेच या बंगल्यांचा वीज, पाणी, गॅसचा पुरवठा बंद करण्यात येणार आहे. नियमानुसार लोकसभा भंग झाल्यानंतर एक महिन्याच्या आत खासदारांनी बंगले रिकामे केले पाहिजेत असा नियम आहे.