
तुषार ओव्हाळ । मुंबई
अनेकवेळा आपल्या कॉलेजमधले किंवा ऑफिसमधले मित्र-मैत्रिणी आपल्याला छळण्यासाठी आपला मोबाईल सायलेंट मोडवर ठेवून लपवतात. त्यानंतर खूप शोधा शोध करून आपल्याला फोन मिळत नाही. इतर मोबाईलवरून आपल्या मोबाईलवर फोन केला तर रिंग जाते पण फोन सायलेंट मोडवर असल्याने तो कुठे ठेवला हे कळून येत नाही.
आपल्याकडे असलेला अँड्रॉईड फोन सायलेंटवर असला तरीही शोधून काढण्याचा एक सोपा उपाय आहे. प्रत्येक अँन्ड्रॉईड मोबाईल सुरू करताना तुम्हाला जी मेल आयडी देणे अपरिहार्य असतं त्याशिवाय तुम्ही फोन वापरू शकत नाही. हा जी मेल आयडी तुमचा गुगल आयडी असतो. त्यावरूनच तुम्ही सर्व APP प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करून वापरू शकता. अशावेळी तुमचा जीमेल म्हणजेच गुगल आयडीचा पासवर्ड महत्त्वाचा असतो.
समजा ऑफिसमध्ये किंवा इतर ठिकाणी तुमचा मोबाईल कोणी लपवून ठेवला असेल तर लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरून तुम्ही जीमेल लॉग इन करा. जीमेल वरून लॉग इन केल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला वरती तुमच्या प्रोफाईलवरून गुगल अकाऊंटवर क्लिक करा. तेव्हा एक नवीन पेज तुमच्या ब्राऊजर मध्ये ओपन होईल.
त्या पेजच्या डाव्या बाजुला हेल्प हा पर्याय असेल त्यावर क्लिक करा. त्याच्यावर क्लिक केल्यावर खाली Find your phone हा पर्याय निवडा. हा पर्याय निवडल्यानंतर गुगल तुम्हाला तुमचा पासवर्ड विचारेल. तुमचा पासवर्ड त्यात टाकावा. नंतर त्यात दोन पर्याय तुम्हाला दिसतील एक रिंग युअर फोन आणि दुसरा फाईंड युअर फोन. त्यापैकी पहिला पर्याय रिंग युअर फोन त्यावर क्लिक करा. तुमचा फोन जर सायलेंट मोडवर जरी असला तरी त्याची मोठ्या आवाजात रिंगटोन वाजेल. या रिंगटोनमुळे तुम्हाला तुमचा फोन कुठे आहे ते कळू शकेल.
मात्र तुमचा फोन जर स्विच ऑफ असेल तर त्याची रिंग वाजत नाही. यासाठी दुसरा पर्याय आहे तो म्हणजे ‘फाईंड युअर फोन’वर . मात्र यामुळे तुमचा फोन नेमका कुठे ठेवला आहे ते कळू शकणार नाही. त्याचं शेवटी वापरलेलं ढोबळ ठिकाण तुम्हाला कळू शकतं.























































