लाखात एक दुतोंडी साप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तोंडावर एक आणि मागून दुसरेच बोलणार्‍या माणसाला दुतोंडी सापाची उपमा दिली जाते, पण कल्याणमध्ये खरोखरच दुतोंडी साप सापडला आहे…. हे ऐकून आश्चर्य वाटेल. घोणस जातीच्या सापाचे हे दुतोंडी पिल्लू आहे. कल्याण पश्चिमेतील रौनक सिटीलगतच्या परिसरात हा अजब साप सापडला आहे.

two-headed-snake-2

येथील हरीश जाधव, संदीप पंडीत या स्थानिक तरुणांना हा साप दिसला आणि त्यांनी फोन करताच सर्पमित्र योगेश कांबळे आणि दत्ता बोंबे घटनास्थळी हजर झाले. त्यांनी या दुर्मिळ सापाला पकडून वन परिक्षेत्र अधिकारी कल्पना वाघेरे यांच्या ताब्यात दिले. जनुकीय बदलांमुळे लाखात एखादाच साप असा जन्माला येतो अशी माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. धर्मा रायबोले यांनी दिली.