
ट्विटरने जगभरातून 10 हजारांपेक्षा जास्त खाती बंद केली आहेत. ही खाती खोटी माहिती आणि प्रचार करीत होती, असे सांगत ट्विटरने खाती कायमची बंद केली आहेत.
ट्विटरने माहिती दिली की, यूएई आणि इजिप्तच्या 273 खात्यांना बंद केले आहे. ही खाती कोणत्या तरी खास उद्देशाने एकमेकांना जोडलेली होती. तसेच कतार, इराण या देशांना समोर ठेवून या खात्यांवरून मोहीम चालवली जात होती. ही खाती सौदी सरकारच्या बाजूने होती. तसेच ही खाती डॉट डेव्ह कंपनीमार्फत चालवली जात होती. याबाबतचे पुरावे ट्विटरला मिळाले आहेत. डॉट डेव्ह ही यूएई आणि इजिप्तमध्ये कार्यरत असणारी खासगी आयटी कंपनी आहे. याव्यतिरिक्त कंपनीने 4284 वेगवेगळी खाती बंद केली आहेत. ही खाती यूएईमधून चालवली जात होती. त्यांचे लक्ष्य येमेन आणि कतार होते. येमेनमधील युद्ध आणि हाऊथी चळवळीवरून ट्विट केले जात होते. ट्विटरने ऑगस्टमध्ये चीनची 2 लाख बनावट खाती शोधली होती. तसेच रशियाची 4500 खाती बंद केली होती.

























































