ट्रक-मोटरसायकल अपघातात बाप-बेटीचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोटरसायकल आणि ट्रक यांच्यात धडक बसून चांदसुर्या येथे शुक्रवारी दुपारी भीषण अपघात झाला. या अपघातात मोटरसायकलवरील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामध्ये वडील आणि तीन वर्षाच्या मुलीचा समावेश आहे.

सागर अनंत सुर्वे (32) आणि त्यांची मुलगी सान्वी सागर सुर्वे (3,रा.निवळी ) हे मोटरसायकलवरून निघालेले असताना चांदसुर्या येथे ट्रक आणि मोटरसायकलची धडक बसून अपघात झाला. या अपघातात सागर सुर्वे आणि सान्वी सुर्वे या दोघांचा मृत्यू झाला.