जम्मू सीमेवरून बीएसएफचा जवान बेपत्ता, शोधमोहीम सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक

जम्मू कश्मीरमध्ये गस्त घालणारा सीमा सुरक्षा दलाचा एक जवान बेपत्ता झाल्याचं वृत्त आहे. या शनिवारपासून हा जवान बेपत्ता असून सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली आहे.

या जवानाचं नाव पारितोष मंडल असं असून ते बीएसएफच्या 36व्या बटालियनमध्ये उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. मंडल हे जम्मू येथील अरनिया सेक्टरच्या जयकिशन चौकीनजीक वाहत असलेल्या नदीच्या तटावरून शनिवारी संध्याकाळपासून बेपत्ता झाले. त्यामुळे ते नदीत बुडाले असावेत, अशी शंका सुरक्षा दलांनी व्यक्त केली आहे. पारितोष शनिवारी गस्तीसाठी बाहेर पडले होते. त्यांच्यासोबत दोन शिपाईही होते.

मुसळधार पावसामुळे नदीच्या पाण्याला वेग आला आहे. त्यामुळे मंडल नदीत पडून वाहून गेले असावेत असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या नदीजवळून वाहणाऱ्या एका नाल्यातही शोध करण्यात येत आहे.