
तबेल्यातील म्हशीच्या दुधाचा दर आता दोन रुपयांनी वाढणार आहेत. पशुखाद्य आणि चार्याच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने दुधाच्या किरकोळ विक्री दरात प्रतिलिटरमागे दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मुंबई मिल्क प्रोडय़ुसर असोसिएशनने घेतला आहे. त्यामुळे प्रतिलिटरचा विक्री दर 74 रुपयांवरून 76 रुपये होणार आहे. 1 ऑक्टोबरपासून हे नवे दर लागू होणार आहेत.
चार्याच्या किमती वाढल्याने मुंबई मिल्क प्रोड्युसर असोसिएशनची जोगेश्वरी येथे बैठक झाली. बैठकीत होलसेल विक्री किंमत 66 रुपयांवरून 68 रुपये करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती असोसिएशनचे सरचिटणीस रामकृपाल उपाध्याय यांनी दिली.
























































