महाराष्ट्र कॅरम संघटनेची चौवार्षिक निवडणूक बिनविरोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र कॅरम असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा व चौवार्षिक निवडणूक रविवारी 29 सप्टेंबर 2019 रोजी काशिनाथ धुरू हॉल, छबिलदास मार्ग, दादर ( पश्चिम ), येथे संपन्न झाली. या निवडणुकीत एकंदर 14 उमेवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरले होते व या सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड करण्यात आली असून, पालघरचे जितेंद्र मनुभाई शाह यांची अध्यक्ष तर मुंबईचे यतीन ठाकूर यांची मानद सचिव म्हणून निवड करण्यात आली. पुण्याचे भारत देसडला यांना कार्याध्यक्षपदी बढती देण्यात आली असून रत्नागिरीचे अजित सावंत हे नव्या कार्यकारिणीतील खजिनदार असतील. माजी मानद सचिव अरुण केदार यांचा सचिव पदाची दोन सत्रे पूर्ण झाली असल्याने त्यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

नवीन कार्यकारिणीत रायगडचे गिरीश तुळपुळे, सांगलीचे धनंजय साठे, ठाण्याचे प्रशाद शेंबेकर, सिंधदुर्गचे योगेश फणसळकर नाशिकचे अशोक कचरे, कोल्हापूरचे अभिजित मोहिते अशा अनेक नव्या चेहयांना संधी मिळाली आहे. ऍड. एकनाथ वी. सावंत यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. तर अभय हडप यांनी त्यांना साहाय्य केले. कॅरम महासंघाने निरीक्षक म्हणून हिंदुस्थानी महासंघाचे उपाध्यक्ष व गोवा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष फ्रान्सिस सेराव यांची नियुक्ती केली होती. तर महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे दयानंद कुमार हे महाराष्ट्र ऑलिम्पिकच्यावतीने निरीक्षक म्हणून उपस्थित होते.