3 ऑक्टोबरपासून बारावी परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
exam_prep
प्रातिनिधिक फोटो

फेब्रुवारी–मार्च 2020 मध्ये होणाऱया बारावी परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. नव्याने परीक्षेला बसणारे, पुनर्परीक्षार्थी, श्रेणी सुधार योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारे तसेच तुरळक विषय घेऊन परीक्षेला बसू इच्छिणारे विद्यार्थी www.mahahsscboard.in या वेबसाइटवरून ऑनलाइन परीक्षा अर्ज करू शकतात.नव्याने परीक्षेला बसणाऱया विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत 3 ते 23 ऑक्टोबरपर्यंत आहे. तसेच इतर विद्यार्थी 24 ते 31 ऑक्टोबरदरम्यान ऑनलाइन अर्ज करू शकतात. विलंब शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत 1 ते 8 नोव्हेंबरपर्यंतच आहे. व्यवसाय अभ्यासक्रमाच्या (एचसीव्हीसी) परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांची माहिती सरल संगणक प्रणालीमध्ये उपलब्ध नसल्याने या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरून घेतले जाणार आहेत. अर्ज भरण्याची मुदत 24 ते 31 ऑक्टोबरपर्यंत आहे, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.