वर्सोव्यात साकारली गुवाहाटीच्या कामाख्या मंदिराची प्रतिकृती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्वधर्मीयांचे सार्वजनिक नवरारात्रोत्सव म्हणून प्रसिद्ध असलेल्या  वर्सोवा, यारी रोड येथील  नवरात्रोत्सवात यंदा गुवाहाटी येथील प्रसिद्ध कामाख्या मंदिराच्या  प्रतिकृतीचा भव्य  देखावा श्री गणेश साईं मंदिर ट्रस्टने  उभारला आहे. हा देखावा आणि सिंहावर आरूढ़ झालेली 10 फूटी दुर्गामातेची भव्य मूर्ती बघण्यासाठी वेसावकरांसह मुंबई, नवी मुंबई, वसई, विरार येथील नागरिकानी आणि कोळी बांधवानी पहिल्या दिवसापासूनच  गर्दी केली आहे.

यंदा येथील नवरात्रोत्सवाचे 35 वे वर्ष आहे. दुर्गामातेची घटस्थापना श्री गणेश साईं मंदिराचे खजिनदार अजित पाटील यांनी सपत्नीक केली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष कमलाकर पाटील, सचिव विकास पाटील तसेच विवेक पाटील, अमित पारधी, विनीत पाटील,लक्ष्मण जाधव आदी समितीचे सक्रिय  कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रसिद्ध कला दिग्दर्शक चंद्रवर्धन मोरे यांनी  हा 40 फुटी गुवाहाटी येथील प्रसिद्ध कामाख्या मंदिराचा  भव्य देखावा भव्य देखावा साकारला असून  दुर्गामातेची  सिंहावर आरूढ़ साकारली आहे. ही 10 फुटी सुंदर मूर्ती मालाड येथील प्रसिद्ध मूर्तिकार पांडुरंग राठोड़ यानी घडवली आहे.