
विधानसभेसाठी सोमवारी 63 मतदारसंघांत 101 उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.
यामध्ये जळगाव – दोन मतदारसंघांत दोन, बुलढाणा- एका मतदारसंघात दोन उमेदवार, वाशिम- एका मतदारसंघांत एक, अमरावतीमधील चार मतदारसंघांत पाच उमेदवार, वर्धा- एका मतदारसंघात एक उमेदवार, भंडारा- एका मतदारसंघात एक उमेदवार, गोंदिया- एका मतदारसंघात एक उमेदवार, चंद्रपूर- एका मतदारसंघात एक उमेदवार, यवतमाळ- दोन मतदारसंघांत तीन उमेदवार, नांदेड- पाच मतदारसंघांत पंधरा उमेदवार, हिंगोली- एका मतदारसंघात एक उमेदवार, परभणी दोन मतदारसंघांत सहा उमेदवार, जालना- एका मतदारसंघात दोन उमेदवार, संभाजीनगरमधील चार मतदारसंघांत आठ उमेदवार, नाशिक- तीन मतदारसंघांत तीन उमेदवार, पालघर- एका मतदारसंघात एक उमेदवार, ठाणे- एका मतदारसंघात एक उमेदवार, रायगड- एका मतदारसंघात पाच उमेदवार, पुणे- सात मतदारसंघांत आठ उमेदवार, नगर- पाच मतदारसंघांत नऊ उमेदवार, बीड- चार मतदारसंघांत 9 उमेदवार, लातूर- तीन मतदारसंघांत तीन उमेदवार,धाराशीवमधील एका मतदारसंघांत एक उमेदवार, सोलापूर- दोन मतदारसंघांत दोन उमेदवार, सातारा- एका मतदारसंघात एक उमेदवार, कोल्हापूर- तीन मतदारसंघांत तीन उमेदवार आणि सांगली जिह्यातील चार मतदारसंघांत सहा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.


























































