व्हॉटस्ऍपचे चॅट आपोआप होणार गायब, नवीन फिचर लवकरच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
whatsapp

मॅसेजिंग ऍप व्हॉटस्ऍप आपल्या युजर्ससाठी सतत नवनवीन अपडेट देत असते. कंपनी सध्या एका भन्नाट फिचरवर काम करत आहे. त्यानुसार पाठविलेला मेसेज किती वेळ दिसेल याची वेळ आता मेसेज पाठवणाऱया युजर्सला ठरविता येणार आहे. एकंदरीत एखाद्याने मेसेज केला तर त्या मेसेजचे आयुष्य किती हे ठरवता येणार असून ही वेळ संपल्यानंतर हे मेसेज आपोआपच डिलीट होणार आहेत.

या नवीन फिचरसाठी कंपनी ऍपमधील सेटिंगमध्ये काही नवीन ऑप्शन समाविष्ट करणार आहे. त्यासाठी डिसऍपीयरिंग मेसेज हे ऑप्शन देणार असून ते सिलेक्ट केल्यानंतर किती वेळानंतर मेसेज आपोआप डिलीट करायचे त्याची वेळ युजर्सना ठरवायची आहे. सध्या व्हॉटस्ऍपवरून नको असलेले मेसेज लगेचच डिलीट केले तर मॅसेज डिलीटेड असे समोरच्या युजर्सला दिसते. नवीन फिचरमध्ये मात्र असे दिसणार नाही. त्याऐवजी टाइम एक्सपायर असे दिसण्याची शक्यता आहे. व्हॉटस्ऍपवर हे फिचर नव्याने आले असले तरी आधीपासूनच हे ऑप्शन टेलिग्राम ऍपवर उपलब्ध आहे.