
महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशभर स्वच्छता अभियान आणि प्लॅस्टिकमुक्तीचा जागर सुरू असताना एक पाऊल पुढे टाकत कल्याण-डोंबिवली महापालिकेने प्लॅस्टिकपासून रस्ता तयार करण्याचा अभिनव प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाची सुरुवात सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख असलेल्या डोंबिवलीत झाली आहे. प्रायोगिक तत्त्वावर पालिकेने कोळसेवाडी येथे 100 मीटरचा प्लॅस्टिकचा रस्ता तयार करण्याचे काम बुधवारपासून सुरू केले आहे. संकलित झालेल्या प्लॅस्टिक डांबरामध्ये मिसळून तयार करण्यात येणारा हा रस्ता स्वस्त आणि टिकाऊ असल्याचा दावा प्रशासनाने केला असून हा प्रयोग यशस्वी झाल्यास यापुढे डोंबिवलीत प्लॅस्टिकच्या रस्त्यांचे जाळे तयार होणार आहे.
– डोंबिवलीच्या कोळसेवाडी परिसरारत 100 मीटरचा प्लॅस्टिकचा रस्ता प्रायोगिक तत्त्वावर तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे 250 किलो प्लॅस्टिकचा वापर केला जाणार आहे.
– तामीळनाडून प्लॅस्टिक रस्त्याचा पहिला प्रयोग झाला. त्यानंतर कणकवली, पुणे, वसईमध्येही प्लॅस्टिकचे रस्ते तयार केले गेले.
– प्लॅस्टिकबंदीनंतर जमा झालेल्या शेकडो टन प्लॅस्टिकचा वापर रस्त्यासाठी होऊ शकतो. त्यामुळे प्लॅस्टिकच्या विल्हेवाटीचा प्रश्नही निकाली निघणार आहे.
असा होणार वापर
पावसामुळे व वाहनांच्या वर्दळीमुळे डांबरी रस्ता उखडण्याची शक्यता असते. मात्र एका विशिष्ट तापमानात डांबर क प्लॅस्टिक एकत्र होते. हे डांबर खडीला घट चिटकून राहात असल्याने रस्ता टिकण्याची क्षमता वाढते. त्यासाठी प्लॅस्टिक मशीनमध्ये क्रश करून ते डांबरामध्ये मिसळून मग त्याचा रस्ता तयार केला जातो. प्लॅस्टिक आणि डांबरच्या मिश्रणामुळे रस्ते अधिक टिकावू बनतात. शिवाय त्यासाठी खर्चही कमी येतो.
शासनाने प्लॅस्टिकबंदी लागू केली आहे. त्याची चोख अंमलबजाकणी करण्यासाठी आदेश सर्व स्थानिक स्कराज्य संस्था आणि महापालिकांना दिले आहेत. प्लॅस्टिककर कारकाई होत आहे, मात्र जे प्लॅस्टिक सध्या अस्तित्कात आहे, त्याचे काय करायचे, असा प्रश्न महापालिकेपुढे आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकाही याला अपवाद नाही. प्लॅस्टिक कचऱयाच्या विघटनासंदर्भात विविध पर्यायांचा विचार सुरू असतानाच सामाजिक कार्यकर्ते नितीन निकम यांनी पालिका आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेतली. तामीळनाडू राज्यात प्लॅस्टिक कचऱयापासून रस्ते तयार करण्यात आले असून महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी हा प्रयोग यशस्वी ठरल्याचे त्यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. कल्याण, डोंबिवलीत खड्डय़ांमुळे रस्त्याची चाळण झाली असताना प्लॅस्टिकचे रस्ते यावर रामबाण उपाय ठरू शकतो, हे पटल्यावर पालिकेने गांधी जयंतीच्या मुहुर्तावर प्लॅस्टिक रस्त्याच्या कामाला सुरुवात केली असल्याची माहिती पालिकेचे उपनगर अभियंता घनश्याम नवांगूळ यांनी दिली.























































