पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी भाजपमधून 90 कार्यकर्त्यांची हकालपट्टी, यादी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bjp-logo

सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या निवडणूका सुरू आहेत. त्यामुळे पक्षांमध्ये बंडखोरीचे प्रमाण वाढले आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली होती. त्यामुळे भाजपमध्ये सध्या बंडखोरांना बाहेरचा रस्ता दाखविण्याचे काम सुरू आहे.

उत्तराखंडमध्ये सध्या पंचायत निवडणुका सुरू आहेत. पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षातून 90 कार्यकर्त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाने या कार्यकर्त्यांची यादी जाहीर केली आहे. उत्तराखंडमधील विविध भागातील जिल्हा स्तरांवरील या कार्यकर्त्यांनी पक्षाविरोधी कारवाया केल्यामुळे तसेच काही कार्यकर्त्यांनी पक्षाविरोधात जाऊन अपक्षपणे पंचायत निवडणूका लढण्याचा निर्णय घेतल्याने त्या कार्यकर्त्यांना निलंबित करण्यात आले आहे. भाजपचे प्रदेश अध्यक्ष अजय भट्ट यांनी हे आदेश दिले आहेत.