शिरोळ तालुक्याला पावसाने झोडपले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिरोळ तालुक्यात शुक्रवारी दुपारी चारनंतर परतीचा मुसळधार पाऊस झाला. यावेळी अक्षरश: ढगफुटी झाल्याचं दिसून आलं. किमान दोन तास तरी पावसाने तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले. विजेच्या कडकडाट बरोबर गाराचा पाऊस ही कोसळत होता. अनेक गावात विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. तालुक्यात झालेल्या जोरदार पावसाने नागरिकांची धावपळ उडाली. अनेक भागात पाणीच पाणी झाले. अचानक आलेल्या पावसाने सर्वच रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले होते.

ग्रामीण भागातील गटारी अरुंद असल्याने मुसळधार झालेल्या पावसामुळे गटारीचे सांडपाणी तुंबुन रस्ता जलमय झाला होता. परतीचा मुसळधार पाऊसने समोरचे कांही दिसत नव्हते त्यामुळे काहीकाळ वाहतूकही बंद झाली होती तसेच कांही ठिकाणी झाडे तुटून पडली तर अनेकांच्या छतावरील पत्रे उडून गेली.सुमारे दोन तास पाऊसाने झोडपून काढल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.