जळगाव घरकुल प्रकरण – गुलाबराव देवकरसह ३५ जणांचा खंडपीठात जामीन मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जळगाव घरकुल प्रकरणातील माजीमंत्री गुलाबराव देवकरांसह तत्कालीन ३५ नगरसेवकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर येथील खंडपीठाचे न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे आणि न्यायमूर्ती के. के. सोनवणे यांनी जामीन मंजूर केला.

जळगाव घरकुल प्रकरणामध्ये धुळे जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवून माजीमंत्री गुलाबराव देवकरसह तत्कालीन ३५ नगरसेवकांना विविध कलमाखाली शिक्षा सुनावली होती. या प्रकरणी जामीन मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर येथील खंडपीठात धाव घेतली होती. या जामीन अर्जावर शुक्रवारी अंतिम सुनावणी झाली असता खंडपीठाने माजीमंत्री गुलाबराव देवकरसह जळगाव महानगर पालिकेचे तत्कालीन ३५ नगरसेवकांना सर्शत जामीन मंजूर केला.

सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण, अ‍ॅड. एम. एम. नेरलीकर यांनी बाजू मांडली तर अर्जदारांच्या वतीने अ‍ॅड. आर. आर. मंत्री, अ‍ॅड. आर. एन. धोर्डे, अ‍ॅड. व्ही. डी. सपकाळ, अ‍ॅड. महेश देशमुख, अ‍ॅड. जॉयदिप चटर्जी, अ‍ॅड. परेश पाटील, अ‍ॅड. किशोर संत यांनी बाजू मांडली.