130 रुपयांत मिळणार केबलची दीडशे चॅनल्स, ग्राहकांचे पैसे वाचणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केबल टीव्ही आता स्वस्त झाला आहे. दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) नवे नियम घालून दिल्यापासून केबल टीव्हीवर आपल्या मनासारखी चॅलेन्सच पाहता येऊ लागली असली तरी त्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त रक्कम मोजावी लागत होती. पण आता ग्राहकांना केवळ 130 रुपयांत दीडशे चॅनेल्स पाहता येऊन महिन्याकाठी त्यांचे 40 रुपये वाचणार आहेत. ऑल इंडिया डिजिटल केबल फेडरेशनच्या निर्णयामुळे ग्राहकांना आता केबल टीव्ही परवडणार आहे.

शंभरहून जास्त चॅनेल्स पाहायची असतील तर यापूर्वी ग्राहकांना पुढील प्रत्येक 25 चॅनेल्ससाठी वेगळे 20 रुपये द्यावे लागत होते. म्हणजे दीडशे चॅनेल्स पाहायची तर 170 रुपये मोजावे लागत होते. मात्र आता केवळ 130 रुपयांमध्येच दीडशे चॅनेल्स पाहाता येतील. हे बदल फेडरेशनने फक्त केबलधारकांसाठीच लागू केले आहेत. डीटीएच ग्राहकांना या बदलांसाठी अजून वाट पाहावी लागेल. प्रोव्हायडर ग्राहकांकडून एचडी चॅनेल्स देतो सांगून जास्त पैसे उकळायला मोकळे झाले. त्यामुळेच आता फेडरेशनने ग्राहकांना दिलासा देत 130 रुपयांमध्ये दीडशे एसडी चॅनेल्स देण्याचा निर्णय घेतला आहे.