जयदत्त क्षीरसागर यांना भारतीय भटक्या विमुक्त जमाती विकास संघटनेचा जाहीर पाठींबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
jaydutt-kshirsagar

 बीड विधानसभेचे शिवसेना-भाजप, रासप, रिपाई महायुतीचे अधिकृत उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांना भारतीय भटक्या विमुक्त जमाती विकास संघटना महाराष्ट्र या संघटनेने जाहीर पाठींबा घोषीत केला आहे.

चौसाळा येथे भटक्या विमुक्त विकास संघटनेची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये विधानसभा निवडणूकीत जयदत्त क्षीरसागर यांना जाहीर पाठींबा देऊन प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार केला. या बैठकीस प्रदेश उपाध्यक्ष दगडूभाऊ गायकवाड, बीड जिल्हा सरचिटणीस डॉ.केशवदास वैष्णव, डॉ.रमेश कैवाडे, ह.भ.प.केशवदास महाराज, प्रा.एम.एस.माने, राजाभाऊ पवार, विवेक कुचेकर, डी.बी.गायकवाड, नामदेव गायकवाड, दशरथ काळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती