
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या तीन दिवसांच्या निवडणूक प्रचार दौर्याचा दुसरा टप्पा 8 आँक्टोबरपासून सुरू होत आहे.10 ऑक्टोबरपर्यंत या टप्प्यात शरद पवार यांच्या प्रचार सभा होतील. पहिल्या टप्प्यात धाराशीव, ठाणे, कोल्हापूर असा निवडणूक प्रचाराचा दौरा केल्यानंतर शरद पवार हे दुसर्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात दौरा करणार आहेत. नगर जिह्यातील पारनेरमध्ये 8 तारखेला सकाळी साडेअकरा वाजता, पारोळय़ात सायंकाळी पाच वाजता, 9 ऑक्टोबरला विदर्भात अकोला जिह्यातील बाळापूर येथे सकाळी साडेअकरा वाजता वाशिम जिह्यातील मानोरा-कारंजा येथे दुपारी चार वाजता, 10 ऑक्टोबरला हिंगणघाट येथे सकाळी साडेदहा वाजता, बुटीबोरी-हिंगणा तीन वाजता, काटोल संध्याकाळी पाच वाजता त्यांच्या जाहीर सभा होतील.



























































