चिपळूणात राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागातील ओवळी गावातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रविवारी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. महायुतीचे उमेदवार सदानंद चव्हाण यांनी त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. कार्यकर्त्यांच्या या प्रवेशामुळे ओवळीतील राष्ट्रवादीला ऐन निवडणूकीत दणका बसला आहे.

दसपटी विभाग हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आमदार सदानंद चव्हाण यांनी नेहमीच दसपटी परिसरात कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत, ओवळी गावातही आमदार चव्हाण यांनी विकासकामांना झुकते माप दिल्याने आमदारांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आज सायंकाळी राष्ट्रवादीच्या या कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार आमदार सदानंद चव्हाण उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

शिवसेनाच आपल्या गावचा विकास करू शकते असा विश्वास असल्याने आपण शिवसेनेत आल्याचे प्रवेशकर्त्यानी सांगितले. त्यावेळी समीर शिंदे युवक राष्ट्रवादी उपाध्यक्ष दसपटी, तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत शिंदे गजेंद्र शिंदे, प्रियवंदणा शिंदे, परशुराम सागवेकर, गणेश घाणेकर, संतोष घाणेकर, संतोष सुतार, गोरी गजेंद्र शिंदे, शामराव शिंदे, सुरेश बोलाडे, शिवाजी कदम,चंद्रकांत शिंदे उपस्थित होते.