
आतापर्यंत अकरावीत कोणत्याही कॉलेजमध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना 17 ऑक्टोबर दुपारी 1 वाजेपर्यंत शिक्षण उपसंचालक कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कॉलेजमधील रिक्त जागांचा आढावा घेऊन या विद्यार्थ्यांना ‘ऑन द स्पॉट’ प्रवेश दिला जाणार आहे.
अकरावीच्या हजारो जगा अद्याप रिक्त आहेत. जे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. अशा विद्यार्थ्यांना रिक्त जागांनुसार कॉलेजमध्ये ऑनलाईन प्रवेश दिला जाणार आहे. आतापर्यंत कोणत्याही कॉलेजमध्ये प्रवेश न घेतलेले, मिळालेला प्रवेश रद्द केलेले, प्रवेश नाकारलेले, एटीकेटी सवलतधारक विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे. उद्या 15 ऑक्टोबरपासून कार्यालयीन वेळेत विद्यार्थ्यांना शिक्षण उपसंचालक कार्यालयात संपर्क साधता येणार असून विद्यार्थ्यांनी सोबत प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे घेऊन यावीत, असे आवाहन शिक्षण उपसंचालक कार्यालयाने केले आहे.
























































