निकालापूर्वीच रोहित पवारांच्या अभिनंदनांचे लागले होर्डिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच राष्ट्रवादीचे रोहित पवार यांच्या विजयाचे होर्डिंग कर्जत-जामखेड परिसरात लागल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. कर्जत जामखेड विधानसभेची मतदानाची टक्केवारी मोठ्या प्रमाणावर झाली आहे, या मतदारसंघांमध्ये भाजपा महायुतीचे उमेदवार राम शिंदे यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

या मतदारसंघांमध्ये राम शिंदे व रोहित पवार यांच्यामध्ये लढत असल्यामुळे कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागले आहे. आज रोहित पवार यांच्या विजयाचे फलक लागल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.