अंबरनाथमध्ये पुन्हा भगवा फडकणार? शिवसेनेला आघाडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
balaji-kinikar

#MahaElection 2019 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे कौल हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहेत. महायुती सत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. असे असताना अंबरनाथमध्ये शिवसेनेचे उमेदवार डॉ. बालाजी किणीकर यांनी मोठी आघाडी घेतली आहे.

अंबरनाथमध्ये सातव्या फेरीनंतर शिवसेनेच्या डॉ. बालाजी किणीकर यांना 15,594 मतं मिळाली आहेत. तर रोहीत साळवे हे 11,121 मतं मिळवत दुसऱ्या क्रमांकावर आहे. धनंजय सुर्वे यांना 6,660 तर मनसेच्या सुमेध भवर यांना 3,736 मतं मिळाली.