आता फेसबुकवरही बघा बातम्या, दर्जैदार पत्रकारितेचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देश विदेशातील व्यक्तींना एकत्र आणणारी लोकप्रिय सोशल साईट फेसबुक (Facebook) वर आता बातम्याही बघता येणार आहेत. फेसबुकने काही निवडक वृत्तसंस्थांबरोबर भागीदारीत वृतसेवा सुरू केली आहे. यासाठी फेसबुक एक वेगळा न्यूज टॅब देणार आहे. सध्या ही सेवा फक्त अमेरिकेतील 200,000 ग्राहकांना देण्यात येणार आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यास ती इतर देशातही सुरू करण्याचा विचार फेसबुक करत आहे.

सध्या प्राथमिक टप्प्यावर फेसबुकने द न्यूयॉर्क टाइम्स, द लॉस एंजलिस टाइम्स, ब्लूमबर्ग मीडिया, यूएसए टुडे पब्लिशर गैनेट कॉर्पोरेश या वृत्त संकेतस्थळांबरोबर करार केला आहे. यातून मिळणाऱ्या प्रतिसादानंतर अन्य 200 वृत्त संकेतस्थळांना फेसबुकबरोबर जोडण्याचा विचार कंपनी करत आहे. कंपनी श्रेणीनुसार चार वृत्तसंकेतस्थळांशी जोडली गेली आहे. यात प्रामुख्याने सामान्य ,सामायिक, आणि टॉपिकल विविध, स्थानीय वृत्त समूहांचा सहभाग आहे.

वाचकांना फेसबुकवर विविध विषयांवरचे लेख वाचता यावे यासाठी वेगवेगळे सेक्शन्स करण्यात येणार आहेत. यात विज्ञान, तंत्रज्ञान, खेळ, मनोरंजन, व्यापार, स्वास्थ यासारखे वेगवेगळे सेक्शन्स असतील. यामुळे यूजर्सला याच व्यासपीठावर विविध माहिती मिळणार आहे.