देवधर ट्रॉफीसाठी तिन्ही संघांची घोषणा, स्टार खेळाडूंचा सहभाग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या सीनियर निवड समितीने प्रो. डी. बी. देवधर ट्रॉफीसाठी हिंदुस्थान अ, ब व क या तिन्ही संघांची निवड केली. हनुमा विहारीकडे हिंदुस्थान ‘अ’ संघाचे, पार्थिव पटेलकडे हिंदुस्थान ‘ब’ संघाचे आणि शुभमन गिलकडे हिंदुस्थान ‘क’ संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. ही स्पर्धा 31 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर या कालावधीत रांची येथे खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेत मयांक अग्रवाल, रविचंद्रन अश्विन, केदार जाधव, विजय शंकर, शाहबाज नदीम या स्टार खेळाडूंच्या सहभागामुळे स्पर्धेतील लढती रोमहर्षक होतील अशी आशा क्रिकेटप्रेमी करीत आहेत.

हिंदुस्थान ‘अ’ – हनुमा विहारी (कर्णधार), देवदत्त पडीकल, ए. आर. इस्वरन, विष्णू विनोद, अमनदीप खरे, अभिषेक रमन, ईशान किशन (यष्टिरक्षक), शाहबाज अहमद, रवी बिष्णोई, रविचंद्रन अश्विन, जयदेव उनाडकट, संदीप वॉरियर, सिद्धार्थ कौल, भार्गव मेराई.

हिंदुस्थान ‘ब’ – पार्थिव पटेल (कर्णधार व यष्टिरक्षक), प्रियांक पांचाल, यशस्वी जैसवाल, बाबा अपराजित, केदार जाधव, ऋतुराज गायकवाड, शाहबाज नदीम, अनुकूल रॉय, के. गौतम, विजय शंकर, मोहम्मद सिराज, रूश कलेरिया, यारा पृथ्वीराज, नितीश राणा.

हिंदुस्थान ‘क’ – शुभमन गिल (कर्णधार), मयांक अग्रवाल, अनमोलप्रीत सिंग, सूर्यकुमार यादव, प्रियम गर्ग, दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक), अक्षर पटेल, मयांक मार्कंडे, जलाज सक्सेना, आवेश खान, धवल कुलकर्णी, इशान पोरेल, डी. जी. पथानिया, विराट सिंग.