
जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी पाच मजुरांची हत्या केली आहे. हे सर्व मजूर कश्मीरच्या बाहेरचे असल्याचे सांगण्यात आले. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पाच मजुरांचा मृत्यू झाला असून एक मजूर गंभीर जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात हलवण्यात आले आहे. हे मजूर रोजंदारीवर काम करण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये आले होते. ते पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेनंतर सुरक्षा दलाने परिसराची नाकाबंदी करून शोधमोहिम हाती घेतली आहे.तसेच परिसरात बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
CRPF: Unidentified terrorists shot dead 5 labourers and injured 1. The injured was evacuated to district hospital Anantnang. All the labourers were reportedly from Murshidabad, West Bengal. Troops of 18 Battalion Army and J&K Police reached the spot and cordon and search started https://t.co/NvSR3kJJar
— ANI (@ANI) October 29, 2019
केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर दहशतवाद्यांकडून वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. युरोपियन युनियनचे प्रतिनिधीमंडळ कश्मीरच्या दौऱ्यावर असतानाच दहशतवाद्यांनी हल्ला करून मजूरांची हत्या केली आहे. तसेच सोमवारी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाला लक्ष्य करत ग्रेनेड हल्ला केला होता. तसेच दहशतवाद्यांकडून ट्रक चालकांनाही लक्ष्य करण्यात येत आहे.

























































