पाकिस्तानमध्ये कराची-रावळपिंडी एक्सप्रेसमध्ये स्फोट, 27 ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानमध्ये गुरुवारी कराची -रावळपिंडी एक्सप्रेसमध्ये झालेल्या स्फोटात 27 जण ठार झाले असून अनेकजण जखमी झाले आहेत. पंजाब प्रांतातील दक्षिणेकडे रहीम यार खानजवळ हा स्फोट झाला. रेल्वेतील पॅन्ट्रीकारमध्ये असलेल्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

स्फोटानंतर तीन बोग्यांनी पेट घेतला आणि बघता बघता ही आग वेगाने पुढील बोगींपर्यंत पसरली. यामुळे अनेकजण आत अडकून पडले. यावेळी काहीजणांनी जीव वाचवण्यासाठी चालत्या गाडीतून उड्या टाकल्या. तर ज्यांना बाहेर पडणे जमले नाही त्यांचा आगीत सापडल्याने होरपळून मृत्यू झाला. कर्मचारी पॅन्ट्रीकारमध्ये सकाळी प्रवाशांसाठी नाश्ता बनवत असताना अचानक सिलिंडरचा स्फोट झाला आणि ही दुर्घटना घडली.