
शुक्रवारी सायंकाळी झारखंडच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून तेथे 30 नोव्हेंबरपासून पाच टप्प्यात मतदान होणार आहे. या निवडणूकीचा निकाल 23 डिसेंबरला जाहीर होणार आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत याची घोषणा केली.
Jharkhand Legislative Assembly elections to the 81 constituencies to be held in five phases from 30 November, counting will be on 23 December. pic.twitter.com/hEU8SRlHXp
— ANI (@ANI) November 1, 2019
Chief Election Commissioner, Sunil Arora: Phase-1: Polls on 30 November, phase 2: Polls on 7 December, phase 3: Polls on 12 December, phase 4: Polls on 16th December, phase 5: Polls on 20th December, and counting on 23rd December. https://t.co/ZI432DMXdo pic.twitter.com/AhZiX4TAw3
— ANI (@ANI) November 1, 2019
झारखंड राज्यात 81 जागांवर निवडणुका होणार असून त्या पाच टप्प्यांत पार पडणार आहेत. पहिला टप्पा 30 नोव्हेंबर, दुसरा टप्पा 7 डिसेंबर, तिसरा टप्पा 12 डिसेंबर, चौथा टप्पा 16 डिसेंबर आणि पाचवा टप्पा 20 डिसेंबरला पार पडणार आहे. 81 विधानसभा मतदारसंघांपैकी 67 मतदारसंघ हे नक्षलग्रस्त आहेत. तर झारखंडमधील 19 जिल्ह्यात नक्षलग्रस्तांचा सर्वाधिक प्रभाव आहे.
2014 साली झारखंड मध्ये निवडणूक चार टप्प्यांत पार पडली होती. यावेळी भाजपला सर्वाधिक 67 जागा मिळाल्या होत्या. वर्तमान विधानसभेचा कार्यकाल 5 जानेवारी 2020 रोजी संपणार आहे.

























































