
बाजीगर, खिलाडी, मैं खिलाडी तू अनाडी, मैं हूँ ना अशा अनेक हिट चित्रपटांचे निर्माते चंपक जैन यांचे गुरुवारी मेंदूच्या विकाराने निधन झाले. ते 52 वर्षांचे होते. चित्रपट निर्मिती व्यतिरिक्त त्यांचा रेकॉर्डिंगचा व्यवसाय होता. व्हीनस या प्रसिद्ध रेकॉर्डिंग कंपनीचे ते मालक होते.
जैन यांच्या निधनावर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. अभिनेता सोनू सूद याने ट्वीट करून जैन यांना श्रद्धांजली वाहिली आहे. चंपक जैन यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. ते एक उत्तम माणूस होते. त्यांच्यासोबत माझ्या खूप चांगल्या आठवणी आहेत, असं म्हणत सोनूने जैन यांना आदरांजली वाहिली आहे.
























































