
कराडधील वराडे गावात निवासी वस्तीमध्ये भारत गॅस एजन्सी गॅस सिलेंडरचा बेकायदा, विनापरवाना साठा केल्यामुळे पोलिसांनी छापा टाकून एकूण 162 सिलेंडर जप्त केले आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव यांना याबाबतची माहिती मिळाली होती. त्यांनी पोलीस पथक तयार करुन तळबीड पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्रीमती जे.डी पाटील, कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे विजय गोडसे, पोलीस हवालदार सतिश जाधव, सचिन साळुखे, योगेश भोसले, चालक फल्ले, एस. डी. शेलार, विलास गभाले पुरावठा निरीक्षक, नितीन गोरे असे पथक तयार करुन वराडे येथे छापा टाकला. यावेळी भारत गॅस एजन्सीच्या 162 सिलिंडरचा बेकायदा, विनापरवाना साठा असुरक्षितपणे ठेवला होता. सिलिंडरचा साठा करुन ठेवणाऱ्या नारायण कारंडे, ( ढेबेवाडी ता. कराड ) अंकुश हजारे, (वराडे, ता. कराड) यांना ताब्यात घेण्यात आले. गुन्ह्यांचा तपास तळबीड पोलीस प्रभारी अधिकारी जे. डी. पाटील करीत आहवत.
























































