मेट्रो कामगाराचा गर्डरखाली चिरडून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक

पश्चिम द्रुतगती महामार्गावर कांदिवली येथे मेट्रो रेल्वेचे काम करणाऱया 25 वर्षीय अर्शद शेख या कामगाराचा समता नगर पोलीस ठाण्याजवळ यू-गर्डरखाली चिरडून मृत्यू झाला. दहिसर ते डी. एन. नगर मेट्रो-2अ या मार्गासाठी हा गर्डर ट्रेलरवरून नेण्यात येत होता. पीन पूलरमधून तो तुटल्याने अपघात होऊन गर्डर मागच्या वाहनावर कोसळला. त्या वाहनात हा कामगार होता.

अर्शद शेख हा मेसर्स जे. कुमार या कंपनीतर्फे मेट्रोसाठी काम करत होता. निष्काळजीमुळे झालेल्या या अपघाताकडे दुर्लक्ष करता येणार नसून यापुढे सर्व कंत्राटदार असे अपघात होणार नाहीत याची काळजी घेतील असे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) प्रवक्ते दिलीप कवठकर यांनी सांगितले.