कश्मीरमध्ये लश्करच्या तीन दहशतवाद्यांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर दहशतवादाविरोधातील अभियान मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गेल्या 24 तासात कश्मीरमधून लश्कर ए तैयब्बाच्या तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.

सुरक्षा दलांनी सोपोर भागातून एका दहशतवाद्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. जम्मू कश्मीर पोलीस आणि सुरक्षा दलाच्या संयुक्त टीमने कारवाई करत या दहशतवाद्याला मोठ्या शस्त्रसाठ्यासह अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 15 दिवसांपासून तो या भागात सक्रिय होता. तसेच तो बारामुला जिल्ह्याचा रहिवासी होता. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. यापूर्वी सुरक्षा दलाने लश्करच्या तीन दहशतवाद्यांना ग्रेनेडसह अटक केली होती.