नवे राज्यपाल सत्यपाल मलिक गोव्यात दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 25 ऑक्टोबर रोजी सत्यपाल मलिक यांची गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर सत्यपाल मलिक शनिवारी दुपारी गोव्यात दाखल झाले आहेत. सभापती राजेश पाटणेकर, मंत्री मिलिंद नाईक, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी दाबोळी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्रदिप नंदराज जोग रविवारी सायंकाळी 4.30 वाजता राजभवनात मलिक यांना राज्यपालपदाची शपथ देणार आहेत.