108 मेगापिक्सेल कॅमेरा असलेला ‘हा’ स्मार्टफोन येतोय!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दररोज टेलिकॉम कंपन्या कोणता ना कोणता नवीन स्मार्टफोन हिंदुस्थानी बाजारात लॉन्च करत असतात. ज्यात कंपनी नवीन कॅमेर्‍यामध्ये अनेक नवीन फीचर्स देऊन बाजारात आणतात. ग्राहकही बाजारात नवीन कोणता स्मार्टफोन येत आहे आणि त्यात कोणते नवीन फीचर्स दिले जाणार याकडे लक्ष ठेवून असतात.

अशातच चीनची स्मार्टफोन कंपनी शाओमीने तब्बल 108 मेगापिक्सेलचा कॅमेरा असणारा दमदार स्मार्टफोन हिंदुस्थानी बाजारात लॉन्च करणार आहे. ‘Mi note 10’ असे या नवीन स्मार्टफोनचे नाव असून कंपनीने यासंबंधित एक टीझरही प्रदर्शित केला आहे. येत्या 14 नोव्हेंबर रोजी हा स्मार्टफोन हिंदुस्थानात लॉन्च करण्यात येईल असे टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे. 108 मेगापिक्सेलचा कॅमेरा असणारा शाओमीचा ‘Mi note 10’ हा जगातील पहिला स्मार्टफोन आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, Mi Note 10 च्या आधी शाओमी आपला Mi CC9 Pro हा स्मार्टफोन हिंदुस्थानी बाजारात लॉन्च करणार आहे. कंपनी ५ नोव्हेंबर रोजी हा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.

Xiaomi Mi Note 10 काय आहेत फीचर्स? 

Mi Note 10 मध्ये 6.7 इंचाची AMOLED स्क्रीन असणार असून, यात स्नॅपड्रॅगन 855+ प्रोसेसर असणार आहे. तसेच या फोनमध्ये 6 जीबी रॅम तर 128 जीबीची स्टोरेज क्षमता देण्यात येणार आहे.