
लश्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटना हिंदुस्थान आणि अफगाणिस्तानमध्ये महाभयंकर दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचत असल्याचा गौप्यस्फोट अमेरिकेने केला आहे. तसेच पाकिस्तानकडून दहशतवादी संघटनांविरोधात कोणतीच कारवाई केली जात नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आपण दहशतवाद्यांना पाठबळ देत नाही अशा वल्गना करणाऱया पाकिस्तानचा बुरखा फाटला आहे.
पाकिस्तानकडून दहशतवाद्यांविरोधात केल्या जाणाऱया कारवाईसंदर्भात अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने अहवाल प्रकाशित केला आहे. त्यामध्ये पाकिस्तानकडून दहशतवादी गटांविरोधात ठोस कारवाई केली जात नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळेच दहशतवादी गट सोकावले असल्याचे अहवालात म्हटले आहे.























































