बीएसएनएल देणार केबल टीव्ही सेवा, 243 रुपयांचे पॅकेज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
cable-tv

गेल्या काही दिवसांपासून ‘बीएसएनएल’ कंपनीने ग्राहकांसाठी अनोख्या योजना आणल्या असताना आता रिलायन्स जीओ फायबर आणि डीटीएचला टक्कर देण्यासाठी 10 ट्रिपल प्ले ब्राँडब्रँड योजना आणली आहे. या योजनेत ‘बीएसएनएल’च्या ग्राहकांना केबल टीव्हीची सेवा देण्यात येणार आहे. पॅकेजची सुरुवात 243 रुपयांपासून असणार आहे.

केबल टीव्ही कंपनीबरोबर भागीदारी
बीएसएनएलच्या ग्राहकांना केबल टीव्ही सेवा देण्यासाठी कंपनीने श्री देवी टेलिव्हीजनबरोबर भागीदारी केली आहे. ही योजना सध्या आंध्र प्रदेशमधील ग्राहकांना दिली जात आहे. श्री देवी टेलिव्हिजन एक केबल सेवा देणारी कंपनी आहे. बीएसएनएलच्या ट्रिपल प्ले प्लॅननुसार ग्राहकाला ब्राँडब्रँड, लँडलाइन आणि केबल सेवा देणार आहे.

‘बीएसएनएल’ची पॅकेज
आतापर्यंत बाजारात आणलेल्या योजनांमध्ये फायबर कोम्बो यूएलडी 645, फायबर कोम्बो यूएलडी सीएस 96, फायबर कोम्बो यूएलडी 2795 सीएस 20 यांचा समावेश आहे. यात 849 रुपये, 1 हजार 277 रुपये, 2 हजार 499रुपये, 4 हजार 499रुपये, 5 हजार 999 रुपये, 9 हजार 999 आणि 16 हजार 999 अशा योजनाही आहेत. हे सगळेच पॅकेज अनलिमिटेड कॉलिंग बेनिफीट असलेले आहेत.

वेगळे टेलिफोन उपकरण खरेदी करावे लागेल!
ट्रिपल प्ले प्लॅन घेतलेल्या ग्राहकासाठी श्री देवी टेलिव्हिजन कंपनी केबल टीव्हीची 7 पॅकेज देणार आहे. सात पॅकेजपैकी सगळय़ात स्वस्त पॅकेज 243 रुपयांचे तर सगळय़ात महाग पॅकेज हे 360 रुपयांचे आहे. या पॅकेजमध्ये असलेल्या ग्राहकाला मोबाईल सेवाही हवी असेल तर वेगळे टेलिफोन उपकरण घ्यावे लागेल. ते उपकरण श्री देवी टेलिव्हिजन कंपनी लावून देईल.