बापरे, पाहा मानवा सारखा हुबेहुब दिसणारा मासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वेड्या वाकड्या आकाराचे, खवले असलेले बरेच मासे आपण पाहिले असतील. डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफी या वाहिन्यांवर जगभरात आढणारे प्राणी दाखवले जातात. मात्र आतापर्यंत आपण कधीच मानवा सारख्या दिसणाऱ्या माशाबद्दल ऐकलेले नाही. हुबेहुब मानवा सारखाच दिसणारा एक मासा सध्या चीनमध्ये आढळून आला आहे. या माशाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो व्हिडीओ बघून नक्कीच तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल.

हा मासा हुबेहुब मानवा सारखा दिसत असून त्याला मानसासारखेच डोळे, नाक, ओठ असल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. एक चिनी महिला मियाओ या गावात फिरायला गेली होती. तेथील तलावाकाठी बसलेली असताना तिला हा विचित्र मासा दिसला. सुरुवातीला असा मासा पाहून ती देखील दचकलीच. मात्र नंतर तिने त्याचा व्हिडीओ काढला. हा व्हिडीओ तिने चीनमधील मायक्रोब्लॉगिंग साईट Weibo वर टाकला. 14 सेकंदाच्या या व्हिडीओला काही वेळातच लाखो लोकांनी शेअर केला. हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात शेअर होत असून जगभरातील लोकांना मानवासारख्या दिसणाऱ्या या माशाबाबत कुतुहल निर्माण झालं आहे.