
एसटी महामंडळाच्या नव्या शयनयान आणि आसन दोन्हींचा समावेश असलेल्या (स्लीपर कम सीटर) सेवेचे मंगळवारी परळ बस स्थानक आगारात लोकार्पण करण्यात येणार आहे. परळ-पाटगाव (भटवाडी) या मार्गावर एसटीची पहिली विना वातानुकूलित ‘स्लीपर कम सीटर’ धावणार आहे. त्यामुळे माफक तिकिटात प्रवाशांना आरामदायी प्रवास करता येणार आहे.
‘शयनयान कम सीटर’ अशा पहिल्या सेवेचा लोकार्पण सोहळा मंगळवारी परळ स्थानकात आयोजित केला आहे. पहिली सेवा परळ-पाटगाव (भटवाडी) मार्गावर सुरू होणार आहे. पाटगाव कोल्हापूर जिल्हय़ाच्या दक्षिणेला 90 कि.मी. अंतरावर वसलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने तसेच श्री. मौनी महाराज यांच्या वास्तव्याने पाटगाव प्रसिद्ध असून तेथे पहिली शयनयान कम आसनांचा समावेश असलेली स्टील बांधणीची विनावातानुकूलित बस धावणार आहे.























































