
कोकणला लाभलेल्या विशाल सह्याद्रीच्या पर्वतरांगा विविध जैवविविधतेने संपन्न असून यामध्य जशा दुर्मीळ वनस्पतींचा खजिना आहे. तसेच दुर्मीळ पक्षी, प्राणी आणि किटक आढळून येतात. संगमेश्वर तालुक्यातील कुंडीच्या जवळ महिमानगड असून या गडाच्या परिसरात फिरत असताना निसर्गप्रेमी प्रतीक मोरे आणि शार्दूल यांना अत्यंत दुर्मीळ समजले जाणारे सह्याद्री योमन प्रजातीचे फुलपाखरू आढळून आले.
प्रतीक मोरे आणि शार्दूल नेहमी प्रमाणे महिमान गडाच्या जंगलात फिरत असताना टॉनी म्हणजेच ब्राऊनिश ऑरेंज कलर आणि बाहेरुन डार्क ब्राउन रंग असलेल्या फुलपाखराने त्यांचे लक्ष वेधुन घेतलं. सकाळच्या कोवळ्या उन्हात याचा रंग बाजूच्या हिरव्या गार झाडीत उठून दिसत होता. नुकताच या फुलपाखरासाठी प्रतीक गोवा राज्यात बोंडला नॅशनल पार्क मध्ये जाऊन आला असल्याने याची ओळख त्याला चटकन पटली.
आपल्या देशात पाच राज्यांनी आपली राज्य फुलपाखरु घोषित केली आहेत. त्यापैकी तमिळनाडु राज्याचे हे एक राज्य आहे. तामिळ संस्कृतीमध्ये फुलपाखरांना अनन्यसाधारण महत्व असून, त्याला मर्वन म्हणजेच तामीली योद्धा अस संबोधल जात. देशभरात फक्त पश्चिम घाटातच मिळणाऱ्या 32 एंडेमिक जातिंमध्ये याचा समावेश होतो. यावरून याची दुर्मिळता आपल्या लक्ष्यात येईल.































































